प्रसिद्ध व्यक्तिमत्व 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/ybc_color.jpg (7837 bytes)   

यशवंतराव चव्हाण        

  • यशवंतराव चव्हाण 

स्वातंत्र्य सैनिक,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील ,कराड तालुक्यातील देवराष्ट्रे या गावी झाला.संसदेत अनेक वेळा त्यांनी या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.राजकारणाशिवाय त्यांनी 'कृष्णाकाठ 'यासारखी इतर  अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या मृदू स्वभावामुळे भारताचे गृहमंत्री,रक्षामंत्री आणि उपपंतप्रधान अशा जबाबदारीची पदे  त्यांना दिली गेली. 

'पंचायत राज' व्यवस्थेची  ओळख सर्वप्रथम त्यांनी करून दिली.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/kbp_color.jpg (6281 bytes)        डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील      
  • डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील 
महान शिक्षणतज्ञ आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राज्यातील सर्वात मोठया शिक्षण संस्थेची स्थापना केली.दि.०५ एप्रिल १९५९ रोजी पुणे विद्यापीठातर्फे त्यांना 'साहित्याचे विशारद' या पदवीने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती  केली. काही सामाजिक संस्था व सहकार चळवळीशी त्यांचा संबंध होता.रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय हे सातारा येथे असून त्याच्या जवळपास ६८९ शाखा संपूर्ण राज्यात पसरलेल्या आहेत.तसेच ४.४२ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/rajmata_color.jpg (7099 bytes)  

    राजमाता सुमित्राराजे भोंसले 

  • राजमाता सुमित्राराजे भोंसले 
छ.शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी  श्रीमंत छ.राजाराम महाराज (आबासाहेब )यांच्या त्या सुनबाई होत. 'कुलवधू'राजमाता सुमित्राराजे भोंसले ह्या जिल्ह्यातील एक आदरणीय व्यक्ती होत्या.

त्या अनेक संस्थेंच्या संस्थापक देखील होत्या. मृद हृदयी राजमातांचे निधन ०५ जून १९९९ रोजी झाले. 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/khashaba_new1.jpg (10924 bytes)         

  • खाशाबा जाधव (१५ जाने.१९२६-१४ ऑ.१९८४)
खाशाबा जाधव यांचा जन्म या जिल्ह्यातील,कराड तालुक्यातील 'गोळेश्वर' या गावी  अत्यंत गरीब घराण्यात झाला. सन २००० पर्यंत ते एकमेव ऑलिम्पिक मेडल विजेता होते.   १९५२ मधील हेलसिंकी वैयक्तिक ऑलिम्पिक मध्ये खुल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी दि.२३ जुलै १९५२ रोजी  वैयक्तिक ब्राँझ मेडल पटकावले,हा आजपर्यंत कुस्तीतील एक विक्रम आहे.

सन १९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना मरणोत्तर 'शिव छत्रपती'पुरस्काराने सन्मानित केले.तसेच सन २००१ साली केंद्र सरकारने मरणोत्तर 'अर्जुन'पुरस्काराने गौरवले.

       खाशाबा जाधव

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

शौर्य पुरस्कार .

सातारा जिल्ह्याला शूर आणि पराक्रमी जवानांचा वारसा लाभलेला आहे. संपूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात  सर्वाधिक,म्हणजेच जवळपास २४००० माजी सैनिक आहेत.उच्च दर्जाच्या पदाकांपैकी जवळपास ९४ पदके या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पटकावली आहेत. त्याचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे -
'शौर्य चक्र'-५  'वीर चक्र'-५   

 

'कीर्ती चक्र'-१  'सेना पदक'-२७  

'वायुसेना पदक'-१        

./../images/ashok_chakra50.bmp (45810 bytes)    
 ''nausena padak' -१ ,  'menshion in dispatch'-१

 'I.S.D.M'.-७ 'millitary cross'-५

 'Millitary Merit'-१३ ,  'I.O.M'.-५

आबा कीर्तकुडे (भोसरे ता. खटाव)     'वीर चक्र' १९४८   
लक्ष्मनराव सितू साळुंखे (वराडे ता.-कराड)   'वीर चक्र' १९६५ भारत-पाक युद्ध
किसान जगदाळे (पेडगाव  ता.खटाव)  'वीर चक्र' १९६५ भारत-पाक युद्ध
हनुमान कृष्णा मोरे (भांबे  ता.पाटण)     'वीर चक्र' १९७१ भारत-पाक युद्ध 
विश्वनाथ भोंसले (आरळे ता.सातारा)   'वीर चक्र' १९७१ भारत-पाक युद्ध 
सतीश एम. शिंदे (सातारा)  'शौर्य चक्र' (मरणोत्तर ) १९६९
आनंद सोपान सावंत (लिंब ता.सातारा)   'शौर्य चक्र' १९८०
रघुनाथ डांगे  (चिंचणेर लिंब ता.सातारा)   'शौर्य चक्र' १९८१
तुकाराम जाधव (दहिवडी,माण)      'शौर्य चक्र' १९८५
श्रीरंग तात्याबा सावंत (बिलापूर ता.खटाव)  'शौर्य चक्र' (मरणोत्तर ) १९८६
शिवाजी जगताप (वडगाव हवेली ता.कराड)  'कीर्ती चक्र' १९९५

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

   

खालील काही व्यक्तींनी त्यांचे बहुमुल्य योगदान विविध क्षेत्रात दिले आहे. त्यांच्या या अनन्य साधारण कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात सातारा जिल्ह्याचे नाव कायम स्मरणात राहिले आहे.
गोपाल गणेश आगरकर जन्म टेंभू ता. कराड जि.सातारा 
लोकहितवादी गोपाल हरी देशमुख 
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 
 किसन  महादेव वीर  स्वातंत्र्य सैनिक,क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उजवा हात समजले जाणारे (कवठे ता.वाई)
बॅरिस्टर अप्पासाहेब पंतप्रतिनिधी औन्ध संस्थानचे राजे, स्वातंत्र्य सैनिक, औन्ध संस्थानात प्रथम 'ग्राम राज्य ' व्यवस्थेची ओळख करून देणारे
ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज  गोंदवले बु ता.माण जि सातारा 
सेवागिरी महाराज पुसेगांव  ता.कोरेगांव जि सातारा
गोपाळनाथ महाराज त्रिपुटी (जांब) ता.सातारा.
जयराम स्वामी वडगांव, जि.सातारा 
रंगनाथ स्वामी निगडी जि.सातारा 
दादा महाराज सातारकर सातारा 
गोविंद स्वामी आफळे क्षेत्र माहुली, ता.सातारा
बाबा महाराज सातारकर सातारा
       रंगभूमी  
चिंतामणराव कोल्हटकर 
बाळ  कोल्हटकर   
स्वराज छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे, भाडले ता.कोरेगांव
एस.जी.गुप्ते   
राजा गोसावी   
जी.पी. देशपांडे    (गोपू)  
   लेखक 
आचार्य काका कालेकर 
एन.एच.आपटे
एन.सी.केळकर  
आर.बी.पारसनीस   
व्यंकटेश मांडगुळकर   
एस.एम.मोटे   
लक्ष्मनराव माने (उपरकर)
   कवी   
कवी यशवंत वाय.डी.पेंढारकर (चाफळ,ता.पाटण )
कवी गिरीष एस.के.कानिटकर (रहिमतपूर ता.कोरेगांव)
बा.सी.मर्ढेकर मर्ढे जि सातारा 
   इतर महत्वाच्या व्यक्ती 
तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी   विविध अंतर राष्ट्रीय पदकांनी सन्मानित,'मराठी विश्वकोष' ची निर्मिती, अधिक माहिती सुरुवातीच्या पानावर 'सीमाचीन्हे' या भागात .
यमुनाबाई वाईकर 'लावणी सम्राज्ञी'आणि विविध आंतरराष्ट्रीय पदक विजेती
शाहीर साबळे आंतरराष्ट्रीय पदक विजेते 
प्राचार्य शिवाजीराव भोंसले  फलटण 
बॅरिस्टर पी.जी.पाटील सातारा 
पी.बी.गजेंद्रगडकर  भारताचे माजी मुख्य न्यायाधीश 
व्ही.जी.उर्फ अण्णासाहेब चिरमुले  'विमा महर्षी' म्हणून प्रसिद्ध,युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक,१९१३ मधील पहिल्या वेस्टर्न इंडिया एन्सुरन्स कंपनीचे संस्थापक.
निळकंठराव कल्याणी  प्रसिद्ध उद्योजक 
ध्यानजीभाई कूपर  कूपर कंपनीचे संस्थापक (सातारा)
बाबुराव काशीद (रहिमतपूर) एशियन्स गेम्स मनिला येथे  'सिल्वर मेडल' विजेते 
नंदा जाधव अंतर राष्ट्रीय दर्जाची खेळाडू (धावपटू)
स्नेहल कदम आणि सतीश कदम   युवा जलतरणपटु(१० वर्षे) ,भारताच्या इतिहासातील जिब्राल्टरची सामुद्रधुनी तिच्या वडिलांसोबत पोहुन पार करण्याचा विक्रम तिने स्थापित केला..

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)